…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही – अजित पवार

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar

महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी जनहित हा आमचा समान कार्यक्रम आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात महाविकासआघाडी सरकार चालवायचे हा निर्धार आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ते गुरुवारी मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी कोरोनावरून मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांच्यावर मिष्कील टीप्पणीही केली.

कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोविडची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

तसेच, अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांच्या कामाचा गौरवदेखील केला. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केले. या दोघांनी कोरोनाची औषधे, इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास दोन्ही नेत्यांकडून सुरु होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER