… तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई :- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अखेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावर स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही. नसे आणि भाजप युतीबदल तुमच्याकडून चर्चा ऐकतोय, असंही पाटील म्हणाले. भारत हा एक देश आहे, त्यामुळेपरप्रांतियांशी संघर्ष योग्य नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत.

अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील, असे पाटील म्हणाले.

पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली आहे. औरंगाबादचे नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असंही पाटील म्हणाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रस्ताव नामांतराचा प्रस्ताव मागे का घेण्यात आला , असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करून देतो, असे आश्वासन पाटील यांनी दिले .

सामनाचा विषय माझ्यासाठी संपला –

माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे,” असं म्हणत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर अधिकच बोलणं टाळले.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज : ना. जयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER