ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारताची अपयशी सुरुवात

Sumit Nagal - Rohan Bopanna

वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत (Tennis competition) म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सुमित नागल (Sumit Nagal) व रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) हे भारतीय खेळाडू पहिल्याच फेरीत बाद झाले आहेत. आता अंकिता रैना व दिवीज शरण यांच्यावर अनुक्रमे महिला व पुरुष दुहेरीत आशा आहे.

रोहन बोपन्ना हा जपानच्या बेन मॅक्लाश्लनच्या जोडीने मैदानात उतरला होता. ही जोडी पहिल्या फेरीत जी सुंग नाम व मिन क्यु सोंग यांच्याकडून ४-६, ६-७ (0) अशी पराभूत झाली.

त्याआधी पुरुष एकेरीच्या मेन ड्रॉमध्ये स्थान मिळालेला सुमित नागल हा लिथुआनियाच्या रिकार्डस बेरांकीस याच्याकडून २-६, ५-७, ३-६ असा पराभूत झाला. हा सामना २ तास १० मिनिटे चालला.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नागल पहिल्यांदाच खेळत होता. तो जागतिक क्रमवारीत १४४ व्या स्थानी असला तरी त्याला वाईल्ड कार्ड देण्यात आले होते.

माजी भारतीय टेनिसपटू सोमदेव देवबर्मनने सुमितच्या खेळावर नाराजी व्यक्त करताना म्हटलेय की, ग्रँड स्लॅम स्पर्धेचा सामना खेळत आहात आणि पहिले पाऊण तास तुमचे लक्ष्य भरकटले आहे असे चालत नाही. त्याने संधी तर गमावल्याच; शिवाय ज्या प्रकारे त्याने त्या गमावल्या ते निराशाजनक होते. तो नर्व्हस होता आणि त्याचा खेळ केवळ अधूनमधून चांगला झाला, असे सोमदेवने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER