पंतप्रधान मोदींची अचानक गुरुद्वाराला भेट; गुरू तेग बहादूर यांना नमन

PM Narendra Modi

नवी दिल्ली :  कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरू तेगबहादूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला. पंतप्रधान मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरू तेग बहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजूला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे.

उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्रॅफिक  बॅरियर लावण्यात आले नव्हते. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली. तसंच इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही ट्विट करण्यात आलं.

‘जिथे श्री गुरू  तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटलं. मी जगातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मलाही खूप प्रेरणा दिली आहे.’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केली. ‘आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाशपर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरू साहेबांचीच कृपा आहे. चला, या  मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू.’ असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER