सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू, १८ जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक

Maharashtra UNLOCK - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकारने म्हटलं होतं. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही झाली. त्यानंतर काल ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश मुख्य सचिवांकडून जारी करण्यात आला. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन या जिल्ह्यात अनलॉकबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे
दुसर्‍या टप्प्यात ६ जिल्हे
तिसरा १० जिल्हे
चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ

पहिला टप्प्यात सर्व सुरू असेल

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे?

मुंबई
मुंबई उपनगर
अहमदनगर
अमरावती
हिंगोली
नंदुरबार

दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?

५० टक्के हाॅटेल सुरू
माॅल चित्रपटगृह – ५० टक्के
लोकल- नाही
सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू
शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली
क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९
संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर
शुटिंग चित्रपट सुरू
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले
लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत
अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत
बांधकाम, कृषी काम खुली
इ काॅमर्स सुरू
जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के सुरू
शासकीय बस आसाम क्षमता १०० टक्के सुरू
जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे

 • अकोला
 • बीड
 • कोल्हापूर
 • उस्मानाबाद
 • रत्नागिरी
 • सांगली
 • सातारा
 • सिंधुदुर्ग

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहील?

अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल,

शनिवार रविवार बंद राहतील

लोकल रेल्वे बंद राहतील
मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,
स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
लग्नसोहळ् ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा
कृषी सर्व कामे मुभा
ई काॅम्रस दुपारी २ पर्संत
जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथा टप्पा

चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

 • अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु
 • सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार
 • क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
 • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
 • लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार
 • अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
 • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
 • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
 • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
 • संचार बंदी लागू असणार
 • सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
 • बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

५वा टप्पा, रेड झोनमध्ये

पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील ५वा टप्पा नेहमी रेड झोनमध्ये असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button