उद्यापासून नागपूरसह १८ जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ‘अनलॉक’, वडेट्टीवार यांची घोषणा

Vijay Vadettiwar

मुंबई :- राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने मोठा निर्णय घेतला केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी उद्यापासून पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यासोबतच राज्यात आता एकूण पाच स्तरांवर अनलॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात भंडारा,बुलढाणा,चंदपूर, धुळे,गडचिरोली,गोंदिया,वर्धा,जालना,लातूर,नागपूर, नांदेड,नाशिक या जिल्ह्यांना सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथील करण्यासाठी ५ टप्पे ठरवण्यात आले आहेत. पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, मुंबईत या आठवड्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button