अनलॉकच्या सुविधा मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री ठरवतील; हिंदुत्वाचा प्रश्न कुणाला पडू नये – संजय राऊत

Sanjay raut-Bhagat Singh Koshyari

मुंबई :  मंदिरं उघडण्यासाठी भाजपने आज राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Kohyari) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून हिंदुत्त्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही माझ्या हिदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे म्हटले आणि हा विषय पुढे वाढत गेला.

त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रकरणात उडी घेतली असून राज्यपालांनी राज्य सरकारच्या अनलॉक धोरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, असेच सुचवणारे विधान केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. हे राज्यघटनेनुसार चालतंय की नाही हे त्यांनी पाहायचं. आणि बाकी इतर गोष्टींसाठी लोकनियुक्त सरकार आहे.

ते निर्णय घेत असतं. चीनचं सैन्य लडाखच्या सीमेवर घुसलंय. आता आपल्या सैन्यानं काय केलं पाहिजे, यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायचं नसतं. देशाचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी बोलायचं असतं. तसंच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जी स्थिती कोरोनामुळे उद्भवली आहे आणि कोणत्या पद्धतीनं अनलॉक करून लोकांना सुविधा निर्माण करायच्या, हे लोकनियुक्त सरकार ठरवेन. मुख्यमंत्री ठरवतील, उपमुख्यमंत्री ठरवतील. त्यांच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही, हा प्रश्न कुणाला पडू नये. सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे फक्त पाहायला पाहिजे.” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER