‘अनलॉक ५’ चा प्रभाव; सूचकांक ४०० ने वाढला

मुंबई : ‘अनलॉक-५’ (Unlock- 5) जाहीर झाल्यानंतर अर्थव्यवस्था खुली होण्याची आशा गृहीत धरून आज शेअर बाजार (Stock market) ४०० आणि निफ्टी ११६ अंकांनी वाढला. अनलॉक-५ नंतर उद्योगांना चांगली संधी आहे, असे जाणकारांचे मत आहे.

सलग दोन सत्रांत  सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली होती. निफ्टी ११३०० अंकांवर स्थिरावला होता. अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारात तेजी असल्याने आज भारतीय बाजारातही तेजी राहील असा अंदाज होता. मंगळवारी ग्रे मार्केट दोन्ही कंपन्यांचे शेअर १५ टक्क्यांनी घसरले होते. आज बाजार उघडताच सेन्सेक्स ४१८ अंकांनी वधारला. निफ्टी १२७ अंकांनी वधारून ११३७४ वर गेला.

पीव्हीआर, आयनॉक्स या शेअरमध्ये अपेक्षितपणे १० टक्क्यांहून अधिक उसळी आली. अनलॉक-५ मध्ये सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आज या शेअरला मागणी दिसून आली. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचसीएल टेक, टायटन, एचयूएल हे शेअर फायद्यात आहेत. एनटीपीसी, नेस्ले आणि ओएनजीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER