आता क्रीडा स्पर्धांना १०० जणांची परवानगी

Unlock 4 Sports Guidelines

कोरोनापश्चात (Post corona) जनजीवन सामान्य होण्याचा अनलॉक-४ (Unlock- 4) टप्पा २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यात फेस मास्क (Face Mask) , सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझरसह १०० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम व क्रीडा (Sport Activities) स्पर्धांची परवानगी देण्यात येणार आहे. यंदा मार्चपासून क्रीडा स्पर्धा ठिकाणी प्रेक्षकांना बंदी करण्यात आलेली होती; पण आता १०० प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंत क्रीडा स्पर्धांवर कडक निर्बंध होते. मात्र आता २१ सप्टेंबरपासून येणाऱ्या अनलॉक-४ मध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व इतर कार्यक्रमांना कमाल १०० लोकांच्या उपस्थितीचे बंधन घालून परवानगी देण्यात येणार आहे. मात्र याला फेस मास्क, सॅनिटायझर, थर्मल मास्क अशी काळजी घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER