अनलॉक -४ : सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची शक्यता

Unlock-4

मुंबई : कोरोनाच्या (Corona virus) पार्श्वभूमीवर अनलॉक-४ साठी (Unlock-4)  केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या पार्श्वभूमीवर एका शासकीय अधिकाऱ्याने संकेत दिले की, सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर सरकार विचार करू शकते. तसेच इनडोअर जिम उघडण्यालाही परवानगी दिली जाऊ शकते. दरम्यान, राज्यातील परिस्थितीचा विचार करून ई-पास (E-pass) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

२ सप्टेंबरपासून लागू होणार्‍या अनलॉक-४ साठी राज्य सरकार एक किंवा दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अनुक्रमे १५ टक्के आणि १० टक्के वाढीस परवानगी देण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, इनडोअर जिम सुरू करण्याला परवानगी देण्याबाबतही सरकार विचार करू शकते.

राज्य सरकारच्या बसेस किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना ई-पासची आवश्यकता नसल्यामुळे खासगी वाहनांचे ई-पास काढण्याचा निर्णय कायम ठेवण्यावर सरकार विचार करत आहे. परंतु, याबाबत मुख्यमंत्र्यांकडून निर्णय घेण्यात येईल. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत ई-पासप्रमाणेच क्यूआर कोड सिस्टम अजूनही कायम राहू शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER