रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथे खून

Murder

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथे साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या व्यक्तीचा खून झाला आहे. मृतदेहावर दगड टाकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.