‘युनिव्हर्स बॉस’ जागतोय आपल्या नावाला!

'Universe Boss' is living up to your name!

ख्रिस गेल (Chris Gayle) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारी कॕरेक्टर आहे. त्याच्या ‘युनिव्हर्स बाॕस’ (Universe Boss) या टोपणनावाप्रमाणेच तो जगभर आंतरराष्ट्रीय व लीग क्रिकेट खेळत असतो. सध्या तो पाकिस्तान सुपर लिगमध्ये (PSL) क्वेट्टा ग्लॕडिएटर्स (Quetta Gladiators) संघातर्फे खेळतोय आणि नेहमीप्रमाणे या स्पर्धेतही खेळताना त्याने विक्रम केले आहेत. सोमवारी लाहोर क्वालांडर्सविरुध्दच्या सामन्यात त्याने 40 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांसह 68 धावा केल्या. ही खेळी त्याच्या संघाला सामना जिंकून देऊ शकली नाही पण एक आगळावेगळा विक्रम मात्र ‘युनिव्हर्स बॉस’ च्या नावावर लागला.

हा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सर्व प्रमुख देशांतील म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशातील टी-20 सामन्यात त्याच्या नावावर आता अर्धशतकी खेळी आहे. पाकिस्तानसह 10 देशांत त्याने आता अशा खेळी केल्या आहेत आणि एवढ्या साऱ्या देशांत टी-20 सामन्यांत अर्धशतकी खेळी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

युनिव्हर्स बाॕसची टी-20 सामन्यांतील प्रत्येक देशातील सर्वोच्च खेळी अशी..

भारत- 175
इंग्लंड- 151
बांग्लादेश- 146
वेस्ट इंडिज-.122
दक्षिण आफ्रिका- 117
झिम्बाब्वे- 109
आॕस्ट्रेलिया- 100
श्रीलंका- 75
पाकिस्तान- 68
न्यूझीलंड- 67

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER