नवीन पटनायक यांच्या आपत्ती व्यवस्थापनाची संराने केली प्रशंसा

Naveen Patnaik-United Nations

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या कामाची संयुक्त राष्ट्र महासंघाने प्रशंसा केली आहे. नवीन आपत्ती व्यवस्थापनाबाबत उत्तम यंत्रणा उभारणारे मुख्यमंत्री असून त्यांनी नैसर्गिक आपत्तीदरम्यान अनेकांचे प्राण वाचवलेत, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

एका वृत्तपत्र समूहाला दिलेल्या मुलाखतीत संयुक्त राष्ट्राच्या ‘डिझास्टर रिस्क रिडक्शन’ (Disaster Risk Reduction) समितीच्या प्रमुख मामी मिझुतोरी म्हणाल्यात की, ओडिशाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये कारभार कसा हाताळावा व आपत्तकालीन व्यवस्था उभारण्यासाठी गुंतवणूक कशी करावी याबाबत आदर्श घालून दिला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात ओडिशाची तयारी पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे आणि ते यासंदर्भातील व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करु शकतात.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी उत्तम यंत्रणा उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे पटनायक यांनी दाखवून दिले. १९९९ साली नैसर्गिक आपत्तींमुळे ओडिशामध्ये समुद्रकिनारी राहणाऱ्या १० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले नाहीत, असे त्या म्हणालात.

२०१३ साली ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलेल्या ‘फिलीन’ वादळानंतरही संयुक्त राष्ट्रांनी पटनायक यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मागील आठवड्यामध्ये आलेल्या ‘यास’ वादळामुळे ओडिशातील सात लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले, हे उल्लेखनीय.

‘यास’ चक्रीवादळामुळे ओडिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी (२८ मे २०२१ रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओडिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button