शिवसेना मंत्र्याची बाळासाहेबांना अनोखी आदरांजली, ७१ हजार सदस्यांची नोंदणी

Balasaheb Thackeray - Shambhuraj Desai

सातारा :- मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतिदिन होता. या दिनानिमित्ताने विविध स्तरावरून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पाटण मतदार संघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले ७१ हजार अर्ज जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सोपवले. मंत्री देसाई यांनी एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचा संकल्प केला होता.

शिवसेना पक्षाने राबविलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात एक लाख सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्हयासाठी तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यातील एक लाख सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दीष्ट होते. त्यानुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्‍मृतिदिन व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले ७१ हजार अर्ज शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेळ कमी मिळाल्याने उर्वरीत २९ हजार सदस्यांचे नोंदणी अर्ज महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : बदलापुर येथे २२ एकर जागेत बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक; आठ महिन्यांत पूर्ण होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER