केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात, पत्नीचा मृत्यू तर नाईकांवर उपचार सुरू

Shripad Naik

बेंगळुरू :- केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांच्या कारला कर्नाटकात भीषण अपघात झाला (Shripad Naik Accident) आहे. या अपघातात नाईक हे जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या नाईक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाईक हे पत्नीसह येल्लापूरहून गोकर्णाला चालले होते. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते.

या भीषण अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह नाईक यांच्या स्वीय सहायकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी दिली.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या अंकोला तालुक्यातील एका गावाजवळ श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला. या घटनेत श्रीपाद नाईक जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला आहे. नाईक यांच्यावर गोव्यात योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचना मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना केली आहे. पुढील उपचारासाठी नाईक यांना गोव्याला हलविण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच, श्रीपाद नाईक लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. हे दुःखद वृत्त मिळताच फडणवीस यांनी ट्विट करत नाईक कुटुंबाचा अपघात आणि केंद्रीय मंत्री यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई नाईक यांच्या निधनाबद्दल ऐकून तीव्र वेदना झाल्यात. नाईक परिवाराबद्दल माझे दु: ख.
मा.श्रीपाद जी नाईक यांना त्वरित बरे होण्यासाठी शुभेच्छा. अशी प्रार्थना फडणवीस यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER