उद्धवजी! काँग्रेस-राष्ट्रवादी सोडा, भाजपा-रिपाइंसोबत सत्ता स्थापन करा : आठवले

Ramdas Athawale - CM Uddhav Thackeray

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची साथ सोडा आणि भाजपा-रिपाइंसोबत सत्ता स्थापन करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. याबाबतचे वृत्त आज बुधवारी एका खाजगी न्यूजपोर्टलने दिले आहे.

यानुसार, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा झिडकारण्याची गरज असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

राम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाची तारीख आज ठरणार?

रामदास आठवले यावेळी म्हणाले, महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असून, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमधील वाद लोकांपुढे सतत पुढे येत आहेत. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणांच्या तपासावरील वाद हे त्याचेच ताजे उदाहरण आहे.

अशा वादांमुळे सरकार चालविणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कठीण जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी निर्णय घेणे गरजेचे असून, सध्याची घडी हीच योग्य वेळ आहे!

दरम्यान, ‘जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत, असेही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.