केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केले आज दिवा लावण्याचे आवाहन

Union Minister Nitin Gadkari tweet an appeal to light diya today

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता नऊ मिनिटं घरातील विजेवरील प्रकाश दिवे बंद करून दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करून याबद्दल आवाहन केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगग पाळा व दिवा, टॉर्च, मेणबत्ती, लावून कोरोनाचा अंधार दूर करण्यासाठी एकजूट होऊ या, असं नितीन गडकरी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. कोरोनाचा अंधकार भारतातून दूर करण्यासाठी एकजूट, एकता हीच भारताची शक्ती आहे. त्यामुळेच प्रत्येकाने नऊ मिनिटांसाठी घरातील दिवा बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च आपल्या अंगणात लावायचा आहे. असे आवाहन पंतप्रधान मोदींसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केले आहे.

दिवा लावताना ही काळजी घ्या
सॅनिटायझरमध्ये काही प्रमाणात ज्वालाग्राही अल्कोहोल असते. त्यामुळे रविवारी रात्री मेणबत्ती किंवा दिवा पेटविताना हाताला सॅनिटायझर लावलेले नाही याची खात्री करा. दिवे लावण्यापूर्वी शक्यतो हात साबणाने धुतलेले असतील किंवा सॅनिटायझर अल्कोहोलमुक्त असेल याची खबरदारी घ्या.