शिवसेना भगव्यात नव्हे, काँग्रेसच्या रंगात रंगली : नितीन गडकरी

Nitin Gadkari -uddhav thackeray

नागपूर :- शिवसेना केवळ आपला रंग भगवा असल्याचे भासवते आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी युती तोडून महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आले आहे. या घडामोडींनंतर गडकरी पहिल्यांदाच आज शुक्रवारी इतक्या आक्रमकपणे शिवसेनेवर बरसलेत, हे येथे उल्लेखनीय.

खडसेंना देण्यासारखं शिवसेनेकडे काही उरलं आहे का? – चंद्रकांत पाटील

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपूर जिल्ह्यातील मांढळ येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपाची साथ सोडून सत्तेत गेलेल्या शिवसेनेवर ही घणाघाती टीका केली.

गडकरी यांनी आपल्या आजच्या सभेत शिवसेनेचा समाचार घेतला. यावेळी गडकरी म्हणाले, शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आहे. सत्तेसाठी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी ही तडजोड केली आहे.