शिवसेनेपाठोपाठ एनडीएतून आणखी एक पक्ष बाहेर; मंत्र्याचा राजीनामा

harsimrat-badal

नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदी सरकारला जोरदार धक्का बसला आहे. संसेदतल्या प्रस्तावित कृषी विधेयकावरून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.

प्रस्तावित कृषी विधेयकांना हरसिमरत कौर बादल यांचे पती आणि पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत यासंबंधी घोषणा करताना केंद्र सरकार आणि भाजपाला समर्थन असेल पण शेतकरी विरोधी राजकारणाचं समर्थन करणार नाही, असं स्पष्ट केलं. भाजपाने विधेयक कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मात्र या विधेयकामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. सरकारच्या नव्याने येणाऱ्या तीन  कायद्यांचा पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे. ३० हजार आडते, कृषी बाजारातील तीन  लाख मजूर आणि २० लाख शेतमजुरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER