केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

nana patole - dr harsh vardhan - Maharastra Today
nana patole - dr harsh vardhan - Maharastra Today

मुंबई : कोरोना (Corona) लसीचा पुरवठा आता केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षाचे चित्र दर्शवतो. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी केंद्राला लसीचा पुरवठा करण्याविषयी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congess) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. “केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. यावर, नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे आणि राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार सतत केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईन
भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. राज्यात सध्या रक्ताचा साठाही कमी आहे. आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे घेत आहोत. राज्यभर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहोत. ‘कोरोनामुक्त बुथ’ असे अभियानही हाती घेत आहोत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोरोना वॉर रूम सुरू करणार आहे. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईन सुरू करणार आहोत. मदत आणि पुनर्वसन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही मंत्र्यांना आम्ही याची जबाबदारी देत आहोत, अशी माहिती पटोले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button