केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर बाबा रामदेव यांनी ‘ते’ वक्तव्य घेतले मागे

Maharashtra Today

कारण असल्याचं म्हटले होते. कोरोना रुग्णांवर  अ‌ॅलोपॅथी औषधांचा (Allopathy medicine) मारा केल्याने त्यांचा मृत्यू होतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला. बाबा रामदेव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. बाबांना पत्र लिहिले. आता बाबा रामदेव यांनी – मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. या विषयाला पूर्णविराम देतो आहे, असे म्हटले आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भात बाबा रामदेव यांना पत्र लिहिले होते की,  अ‌ॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवर टीका करणे दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासी खूप दुःखी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्याने खूप दु:ख झाले. आपण या विषयावर गंभीरतेनं विचार कराल आणि कोरोना योद्धांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल, अशी अपेक्षा आहे.

डॉ. हर्षवर्धन यांच्या या पत्रानंतर बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या वादाला मी पूर्ण विराम देत आहे. माझे वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही  अ‌ॅलोपॅथीचे आणि आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक  अ‌ॅलोपॅथीने खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझे जे वक्तव्य कोट केले आहे, ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हाॅट्स  अ‌ॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेले आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे.

<>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button