भारताला तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देणार युनिसेफ

Maharashtra Today

देशात कोरोनाची(Corona) दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्र पुढे सरसावले आहे. संयुक्त राष्ट्र संघटना भारताला विविध आरोग्य़ासंबंधीत सेवा- सुविधा देणार असून यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश (UNICEF to supply 3,000 oxygen concentrators to India) आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचा प्रमुखांचे उपप्रवक्ता फरहान हक यांनी दिली.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरस यांनी “भारतातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही त्यांचा पाठीशी उभे आहोत” असल्याचे ट्वीट केले होते. या ट्विटचा उल्लेख करून फरहान हक यांनी सांगितले “भारताला आरोग्य चाचण्यांसाठी आवश्यक उपकरणे, ८५ आरटी-पीसीआर, अन्य आरोग्यविषयक आवश्यक वस्तू आणि तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही देत आहोत.”

महाराष्ट्र आणि ईशान्य भारतात २५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी युनिसेफ मदत करणार आहे. याशिवाय भारतातील प्रत्येक बंदरात थर्मल स्कॅनरची उभारणी केली जात आहे, अशी माहितीही हक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button