‘गूगल कर’(Google Tax) ला भारताचा पाठिंबा

Googel

नवी दिल्ली :- अमेरिकेने ‘डिजिटल ट्रॅन्जेक्शन कर’ किंवा ‘इक्विलायजेशन लेव्ही’बाबत चौकशी सुरू केली आहे.  यात नेटफ्लेक्स, अमेझॉनसारख्या कंपन्यांचे आर्थिक (जाहिरातविषयक) व्यवहार येतात.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडनेही डिजिटल कर प्रस्तावित केले आहे व इतर देशही याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत ओईसीडीने (इकॉनामिकल कार्पोरेशन अँड डेव्हलपमेंट) नापसंती दर्शवली आहे. याबाबत अमेरिका १० देशांमध्ये चौकशी सुरू करणार आहे.

भारताचा या ‘गूगल कर’ला पाठिंबा आहे. कर खात्यातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, सर्व परदेशी कंपन्या या कराच्या कक्षेत येतात. व्यापारतज्ज्ञांचे मत आहे की, इक्विलायजेशन लेव्ही लावणे भारताच्या अधिकारात येते.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, हा कर ऑनलाईन जाहिराती देणाऱ्या कंपन्यांवर लागतो. अनेक टेक्नॉलॉजी कंपन्या त्यांच्या जाहिराती फक्त ऑनलाईन देतात. ‘गूगल कर’ने सरकारने त्या कंपन्यांना कराच्या कक्षेत आणले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER