शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के जिंकलो : आ. निलेश लंके

Nilesh Lanke - Sharad Pawar

नगर : ‘के के रेंजचा प्रश्न सोडवणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळेच शक्य झाले आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के जिंकलो आहोत,’ असा दावा आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला आहे.

के के रेंजसाठी शेतकऱ्यांची एक इंच सुद्धा जमीन जाणार नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के जिंकलो असून हा प्रश्न सोडवणे शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाले. कारण हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून म्हणजे १९६९ पासून प्रलंबित होता. तो शरद पवार यांच्या माध्यमातून सोडवण्यात यश आले आहे, असे लंके म्हणाले . ते नगरमध्ये बोलत होते.

तसेच माझे नाते शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करायचे नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

के के रेंज विस्ताराचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये चांगलाच ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील २३ गावातील जमीन अधिग्रहण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तर, खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही संरक्षणमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर मात्र के के रेंज विस्ताराबाबत दोन्ही पक्षांकडून विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच मागील आठवड्यात यावर बोलताना खासदार विखे म्हणाले होते की, ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायचा की नरेंद्र मोदी यांच्यावर हे जनतेनेच ठरवावे. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.’

विखे यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत आमदार लंके यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत घेण्यात आलेली मिटींग अधिकृत होती. या मिटींगचे फोटो व्हायरल झाले आहेत. या मिटींगला तिन्ही दलाचे प्रमुख तसेच संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते. मिटींगमध्ये राजनाथ सिंह यांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या. त्यानंतर जो निर्णय झाला, तो योग्य असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER