एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी खानदेशात मोठी मजल मारेल : अनिल देशमुख

Eknath Khadse - Anil Deshmukh

मुंबई : भाजपला (BJP) राम राम करत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या काळात खानदेशात (Khandesh North Maharashtra) मोठी मजल मारेल, असा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी केला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराच्या पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आज रविवारी अनिल देशमुख हे शहादा येथे आले आहेत. यावेळी ते बोलत होते .

अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील महाआघाडी सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडणार, या फक्त वावड्या आहेत. महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत आणि स्थिर आहे. सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेन, असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच गट-तट बाजूला ठेवून पक्षवाढीच्या कामाला लागण्याचे आदेशदेखील अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER