कुख्यात गुंड संतोष आंबेकर याची निर्दोष मुक्तता

नागपूर : रवींद्र उर्फ बाल्या गावंडे याच्यायाच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात गुंड संतोष आंबेकर याची काल सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. ज्याची हत्या झाली तो बाल्या गावंडे हा देखील गुंड प्रवृत्तीचा होता. जुन्या वैमनस्यातून बाल्या गावंडेंची योगेश सावजी याच्या घरी हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटात संतोष आंबेकरचा ही हात असल्याचा संशय पोलिसांना होता. या घटने नंतर तो बरेच दिवस फरार ही होता पण नंतर त्याने न्यायालयात जावून आत्मसमर्पण केले होते. बरेच दिवस हा खटला चालल्या नंतर सरकारी वकिलांना संतोष आंबेकर विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात दाखल करता आल्याने अतिरक्त सत्र न्यायाधीश ए.एस.काझी यांनी त्याची निर्दोष मुक्तता केली.

सरकारी पक्षाने संतोष आंबेकर याच्यासह इतर आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच साक्षीदार व पुरावे देखील दाखल केले. संतोष आंबेकरच्या वतीने बाजू मांडताना अॅड. आर.के. तिवारी यांनी बाल्या गावंडे याची हत्या संतोषच्या सांगण्यवरून करण्यात आल्याचा कोणताही पुरावा सरकारी पक्षाला सादर करता आलेला नाही, असा दावा केला. केवळ संशयाच्या आधारे संतोष आंबेकरला या हत्याप्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यानेच हत्येचा कट रचला अथवा तो स्वत: त्या पार्टीला हजर होता, त्याचे पुरावे देखील दाखल करण्यात आलेले नाहीत.

ही बातमी पण वाचा : सीबीआयकडून गँगस्टर संतोष आंबेकरची चौकशी

याशिवाय बाल्या गावंडे याची हत्या करण्यासाठी योगेशला सुपारी देण्यात आल्याचेही पुरावे नाहीत. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कोणत्याही शस्त्राची संतोष आंबेकर याच्याकडून जप्ती करण्यात आलेली नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित या प्रकरणातील प्रत्येक पुरावा साखळी जोडणे आवश्यक आहे. परंतु, संतोष आंबेकर याच्या इशाऱ्याने हत्या झाल्याचा पुरावा सादर करता आलेला नाही. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून सत्र न्यायालयाने आंबेकर याची निर्देाष मुक्तता केली.