नवव्या गड्यासाठीच्या मोठ्या भागिदारी चेन्नईकडूनच आणि मुंबईविरुध्दच!

Chennai and against Mumbai

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये शारजाच्या (Sharjah) ज्या मैदानावर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांचा पाउस पडला त्याच मैदानावर शुक्रवारी मुंबईविरुध्द (MI) चेन्नईचा (CSK) संघ अर्धशतक तरी गाठेल की नाही अशी स्थिती होती. 8.5 षटकात 7 बाद 43 अशा स्थितीतून त्यांनी 9 बाद 114 धावांपर्यंत मजल मारली यासाठी त्यांनी धन्यवाद द्यायला हवेत ते अष्टपैलू सॅम करनला (Sam Curran) . सॅमने 47 चेंडूत 52 धावांची जी खेळी केली आणि शार्दुल ठाकूर व इम्रान ताहीरसोबत (Imran Tahir) ज्या धावा जोडल्या त्यामुळे ते शंभरीच्या पुढे पोहोचले.

यात सॅम करन व इम्रान ताहीर (नाबाद 13)यांनी नवव्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केली. ही आयपीएलच्या इतिहासातील नवव्या गड्यासाठीची सर्वोच्च भागिदारी ठरली आणि यानिमित्ताने आयपीएलमधील नवव्या गड्यासाठीच्या सर्वोत्तम भागिदारींचा एक विलक्षण योगायोग समोर आला.

आयपीएलमध्ये नवव्या गड्यासाठीच्या ज्या सर्वोच्च तीन भागिदारी आहेत त्या तिन्ही चेन्नई सुपर किंग्जच्याच आहेत आणि अविश्वसनीय बाब ही की या तिन्ही भागिदाऱ्या मुंबई इंडियन्सविरुध्दच आहेत. या तीन पैकी दोन वेळा एक फलंदाज इम्रान ताहीर होता

त्यांचा तपशील असा

43 -सॅम करन व इम्रान ताहीर – वि. मुंबई 2020
41- एम.एस.धोनी व आर. अश्विन – वि. मुंबई 2013
41 – ड्वेन ब्राव्हो व इम्रान ताहीर – वि. मुंबई 2018

यापैकी 2013 ची भागिदारी होती ती अंतिम सामन्यातील होती. तो सामना चेन्नईने 23 धावांनी गमावला होता. त्यात 8 बाद 51 वरुन त्यांनी 9 बाद 99 अशी मजल मारली होती. त्यात अश्विनचे योगदान 9 धावांचे होते तर धोनीने नाबाद 63 धावांची खेळी केली होती.

2018 च्या भागिदारीचा चित्तथरारक सामना चेन्नईने फक्त एक चेंडू शिल्लक असताना एका गड्याने जिंकला होता. 8 बाद 118 ते 9 बाद 159 अशा त्या भागिदारीत इम्रान ताहीरचे योगदान फक्त दोन धावांचे होते. ब्राव्होने 68 धावांची खेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER