आता सोनू सुद महापालिकेच्या निशाण्यावर, अनाधिकृत बांधकामाविरोधात BMC ची पोलिसांकडे तक्रार

Sonu Sood-bmc

मुंबई : अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार (BMC Complaint Against Sonu Sood In Police) दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) (MRTP) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने केलेलं बांधकाम हे अनधिकृत आहे याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER