चूक पंचाची पण, भूर्दंड पडला पंजाबला

umpires-mistake-cost-punjab-dearly

यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे (KingsXIPunjab) आव्हान संपले आहे. पण त्यांचा यंदाचा प्रवास म्हणजे चूक कुणाची आणि शिक्षा कुणाला असा राहिला आहे. यंदाच्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात पंचाने दिलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा त्यांना जबर फटका बसला आहे.

पंचांनी ती चूक केली नसती तर आज कदाचित प्ले आॕफमधील (Play Off) त्यांचे स्थान निश्चित झालेले असते. कारण शेवटच्या सामन्यापर्यंत ते स्पर्धेत होते. त्यांनी पहिल्या सातपैकी सहा सामने गमावले होते. पण त्यानंतर ओळीने पुढचे पाच सामने जिंकले आणि प्ले आॕफच्या स्पर्धेत ते आले होते. मात्र शेवटच्या दोन सामन्यात राजस्थान (Rajsthan) व चेन्नई (CSK) कडून पराभवाने त्यांचे आव्हान संपवले.

पहिल्याच सामन्यात जी वैध धाव ‘शाॕर्ट रन’ म्हणून पंचांनी अवैध ठरवली त्याची किंमत त्यांना शेवटी चुकवावी लागली. 20 सप्टेंबरला दिल्ली कॕपिटल्सविरुध्दच्या (DC) सामन्यात पंच नितीन मेनन यांच्याकडून शाॕर्टरनची (Short run) ही चूक घडली होती तेंव्हाच ही चूक पंजाबला महागात पडू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली होती आणि ती खरी ठरली.

त्या सामन्याच्या 19 व्या षटकात पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जाॕर्डनने क्रीझच्या आत बॕट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची ही धाव अवैध ठरवली होती. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ही धाव पंजाबला मिळाली असती तर तो सामना ‘टाय’ राहिला नसता आणि नियोजीत वेळेतच पंजाबने जिंकला असता. पण दुर्देवाने ती धाव पंजाबला नाकारली गेली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर कसिगो रबाडाने दिल्लीसाठी विजय खेचून आणला होता. त्या गमावलेल्या दोन गुणांची किंमत किंग्ज इलेव्हनला प्ले आॕफमधील स्थानाने चुकवावी लागली आहे.

त्यावेळीच पंजाबचे सीईओ सुरेश मेमन यांनी ही चूक महाग पडू शकते असे म्हटले होते तर किंग्ज इलेव्हनची मालकीण प्रीटी झिंटा हिने तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग काय, असा सवाल केला होता.

पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल यानेसुध्दा आपला संघ बाहेर झाल्यावर सर्वप्रथम हा शाॕर्ट रन चाच मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र त्यासोबतच त्याने काही आवाक्यातले सामने गमावणेही महागात पडल्याचे म्हटले आहे. यंदाच्या मोसमात आम्ही चूका केल्या. त्या मान्य करायला हव्या आणि त्यापासून धडा घ्यायला हवा असे म्हणताना स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फलंदाजी व गोलंदाजीत एकत्रित कामगिरी झाली नसल्याचे मान्य केले मात्र ख्रिस गेल आल्यानंतर त्यांची फलंदाजी मजबूत बनली आणि पुढचे ओळीने पाच सामने त्यांनी जिंकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER