
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने पंच (umpires) आणि गुणलेखक (Scorer) यांचा कार्यकाळ 5 वर्षांनी वाढवला आहे. मंडळाने पंच व गुणलेखकांचे निवृत्तीचे वय 55 वर्षांवरुन 60 वर्ष केले आहे. मंडळाच्या अहमदाबाद येथे गुरुवारी पार पडलेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्या 140 पंच आहेत.
यामुळे जे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि जे अधिक काळ करु शकतात असे पंच व स्कोअरर्स यांना फायदा होणार आहे. मंडळाने 2002 मध्ये निवृत्तीचे वय 55 वर्ष केले होते आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हीच वयोमर्यादा 58 वर्ष निश्चित केली होती. यंदा काही पंचांनी मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना ही वयोमर्यादा वाढवून 60 वर्षे करण्याची विनंती केली आहे. मंडळाचे हे अतिशय स्तुत्य पाऊल आहे. याचा फायदा बऱ्याच पंचांना भारतीय क्रिकेटची सेवा करण्यास होणार आहे. त्यामुळे सामन्यांचा दर्जा उंचावणार असल्याचे एका वरिष्ठ पंचांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला