चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव; मात्र संजय राऊत मुंबईतच रोखणार’

मुंबई :- तौक्ते (Tauktae cyclone) चक्रीवादळ महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातून गुजरातकडे सरकत आहे. या वादळाने तीव्र वेग धरला असून, मुंबईसह अनेक भागांना याचा फटका बसला आहे. आज सकाळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. चक्रीवादळामुळे एकीकडे नुकसान होत असून, दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवरही या वादळासंदर्भात जोरदार चर्चा आहे. अनेक फोटो, व्हिडीओंबरोबरच यंदाही वादळाच्या गंभीर परिस्थितीही हलके पुलके विनोद आणि मिम्सही शेअर केले जात आहेत. जळगावचे भाजपा खासदार उमेश पाटील यांनीही अशाच प्रकारचा एक व्हायरल मेसेज सोशल नेटवर्किंगवर शेअर करत तौक्ते वादळावरुन शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.

चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा (PM Modi-Amit Shah) डाव असून संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या व्हेरिफाइड अकाऊंटवरुन ट्विट करत राऊतांवर टोला हाणला.

ही बातमी पण वाचा : कधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button