‘मी आपल्यापेक्षा वरिष्ठ, पीडितेच्या कुटुंबियांना भेटू द्या’, उमाभारती यांचा योगींना सल्ला

Yogi Adityanath-Uma Bharti

नवी दिल्ली : हाथरस प्रकरणावरून भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्या नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. योगीजी आपण स्वच्छ प्रतिमा असलेले शासक म्हणून ओळखले जातात. माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची (Hathsar victim family) भेट घेऊ द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली. मी भाजपमध्ये आपली मोठी बहीण आहे, माझ्या विनंतीला नकार देऊ नका, असेही भारतींनी म्हटले आहे. त्या सध्या कोरोना पॉझिटिव्ह असून एम्समध्ये उपचार घेत आहेत. भारती यांनी एका मागोमाग 7 ट्विट केले आहेत.

कोरोना वार्ड मी अस्वस्थ असून कोरोनाबाधित नसते तर सध्या पीडित परिवाराच्या गावात असते. एम्सच्या ऋषिकेश वार्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडित कुटुंबाला भेटणार असल्याचे उमा भारतींनी म्हटले.

तसेच ‘हाथरसच्या घटनेबद्दल मी पाहिले. प्रथम मी विचार केला की मी बोलू नये, कारण आपण या बाबतीत योग्य कारवाई करत आहात. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने गाव आणि पीडितेच्या कुटूंबाला घेरले आहे, तेथे कितीही युक्तिवाद असले तरी ते विविध भीती आणि शंका निर्माण करतात’, अश्याही उमा भारती म्हणाल्या आहेत.

blockquote class=”twitter-tweet tw-align-center”>

३)मैंने हाथरस की घटना के बारे में देखा । पहले तो मुझे लगा की मै ना बोलूँ क्यूँकि आप इस सम्बंध में ठीक ही कार्यवाही कर रहे होंगे । किन्तु जिस प्रकार से पुलिस ने गाव की एवं पीड़ित परिवार की घेराबंदी की है उसके कितने भी तर्क हो लेकिन इससे विभिन्न आशंकाये जन्मती है ।

— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020

 

 

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER