टाटा मोटर्सने आणल्या खास महिलांसाठी अल्ट्रा मिडी बसेस

- पहिल्या टप्प्यात पुण्याचा समावेश

Ultra midi buses for special women brought by Tata Motors

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्स ही कंपनी सामाजिक बांधिलकी जपण्यात कायम अग्रेसर असते. याच तत्वाचे पालन करीत कंपनीने खास महिलांसाठी अल्ट्रा मिडी बसेस आणल्या आहेत. पुण्यामध्ये या बसेसचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे.

या बसेस चालक, प्रवासी आणि आपरेटर्स अशा सर्वांच्याच सोयीच्या आहेत. चालकाची दमछाक होऊ नये यासाठी ऑटोमेटड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञानासह डिझाइन तयार करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस), फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टमच्या सुविधा यात आहेत. याखेरीज वापरकर्त्यांना गाडीची देखभाल करणे आणि ट्रॅकिंग सोपे व्हावे यासाठी अत्याधुनिक टेलिमॅटिक्सने सज्ज या बसेस आहेत.

ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञान चालकांना अप्रतिम अनुभव देते. ज्यामुळे बस चालवताना त्यांना थकायला होत नाही. महिला प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन या बसमध्ये फायर डिटेक्शन अॅण्ड सस्पेंशन सिस्टम (एफडीएसएस) यासारख्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सुविधा देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक माहितीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स (आयटीएस) देण्यात आली आहे. तसेच, जीपीएसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डेस्टिनेशन डिस्प्ले बोर्डही कार्यरत आहेत. म्हणजेच, यावर स्थानकांची माहिती दिली जाईल. यातील इनबिल्ट टेलिमॅटिक्स प्रणालीच्या साह्याने स्टेट ट्रान्सपोर्ट युनिट्सना (एसटीयू) संपर्काच्या अधिक सुविधा मिळतील. त्यामुळे, कार्यचलनातील परिणामकारकता वाढेल आणि गाडीची देखभाल करणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे या गोष्टी वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीच्या होतील.

महाराष्ट्र सरकारच्या ‘तेजस्विनी’ योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी या बसेस तयार करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने ३३ मधील उर्वरित २७ बसेस टाटा मोटर्सतर्फे रवान्या केल्या जाणार आहेत.