… बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची धार! काँग्रेस नेत्याने दिल्या आठवणींना उजाळा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 95 वी जयंतीनिमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas pawar) यांनी बाळासाहेबांच्या खास आठवणी जागवल्या आहेत.

राज्यातल्या बदललेल्या नव्या राजकीय समीकरणांनुसार सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु हे सरकार बनलं कसं?, अगदी टोकाच्या विचारधारा एकत्र आल्या कशा? याची काही पूर्वपुण्याई आहे का?, याचा अभ्यास करताना बाळासाहेबांनी पक्षापलीकडची जपलेली मैत्री, तिला वेळोवेळी घातलेलं खतपाणी, बुचकाळ्यात टाकणारे काही राजकीय निर्णय कारणीभूत असल्याचे उल्हास पवार सांगतात.

अनेकदा भाषण करताना ‘अमुक तमुक फार उमद्या मनाचे’ असं बोलण्याचा प्रघात आहे…. पण ते केवळ बोलण्यासाठी… मात्र मनाचा मोठेपणा आणि उमदेपणा काय असतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. जे आहे ते तोंडावर…. पाठीमागे बोलण्याची बाळासाहेबांना कधीच सवय नव्हती… त्यांच्या तोंडातून एखादं वाक्य निघालं की निघालं… त्यांचं वैशिष्ट म्हणजे ते त्यांच्या मतांवर ठाम राहायचे. मी हे बोललोच नव्हतो, असं त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच म्हटलं नाही… याची आठवण सांगताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर संघर्षावेळी बाळासाहेबांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘घरात नाही पीठ मग कशाला हवंय विद्यापीठ’, या बाळासाहेबांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात गदारोळ माजला. मोठी राजकीय कोंडी झालेली असताना देखील बाळासाहेबांनी त्यांचे वाक्य माघारी न घेता त्या वाक्यापाठीमागचा संदर्भ दिला. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील, असे उल्हास पवार म्हणाले.

बाळासाहेबांची मुस्लिम समाजावरची त्या काळची वक्तव्ये ऐकली तर मुस्लिम व्यक्ती शिवसेनेत काम करतोय, हे वाटणं अशक्यच… पण साबीर शेख यांना बाळासाहेबांनी ताकद दिली. त्यांच्या कधी जातीचा विचार केला नाही. त्यांना विधानसभेवर पाठवून खरी सेक्युलर भूमिका काय असते, हे बाळासाहेबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले .

चंद्रकांत खैरे हे औरंगाबादचे, मागास समाजातून आलेले…. पाचवीला पुजलेली गरिबी… पण बाळासाहेबांवर निस्सीम श्रद्धा… औरंगाबादेत त्यांच्या जातीची मुठभर मतं… पण त्यांच्यातलं संघटनकौशल्य आणि नेतृत्वगुण बाळासाहेबांनी हेरला आणि कडवट शिवसैनिक पुढे शिवसेनेचा प्रमुख नेता बनला… लोकसभेचा खासदार झाला .

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. सेनेसाठी हा धक्का होता. भुजबळांना काहीही करुन आस्मान दाखवायचं हे बाळासाहेबांनी ठरववलं होतं. दलित समाजातून असलेल्या बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या माझगावमधून बाळासाहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली. आणि नांदगावकरांनीही भुजबळांना पराभूत करत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केले .

या तीनही नेत्यांच्या बाबतीत उमेदवारी देताना बाळासाहेबांनी कधी जात बघितली नाही. बघितली नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या जातीचा कधी उल्लेखही केला नाही, हे बाळासाहेबांचं सर्वांत मोठेपण होतं. बाळासाहेबांनी अशा अनेक माणसांना मोठं केलं. अनेक पदांवर बसवलं. बाळासाहेबांचं हिंदुत्व फक्त भाषणांपुरते मर्यादित नव्हतं तर त्यांच्या कृतीतून त्यांनी पुरोगाम्यांनाही लाजवेल असा सेक्युलरपणा जपला, असे उल्हास पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER