प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान असतील प्रमुख पाहुणे

UK Prime Minister Boris Johnson has accepted India's Republic Day invite for 2021.

दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना २०१२ च्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण स्वीकारले असून ते प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. याबाबत २७ नोव्हेंबर रोजी मोदी व बोरिस जॉन्सन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचे सांगत जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी-७ परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. या वर्षी जी-७ परिषद ब्रिटनमध्ये होणार आहे.

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर बोरिस जॉन्सन यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निमंत्रण स्वीकारल्याचे कळवले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी-७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले.

ब्रिटनला भारतासोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. एस. जयशंकर आणि डॉमनिक राब यांच्या चर्चेदरम्यान दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. “आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थिती, आखाती देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीची समीक्षा केली. कोरोना महासाथीनंतर आर्थिक गाडा रुळावर येण्यासाठी भारत आणि ब्रिटन परस्पर सहकार्य अधिक दृढ करतील, असे जयशंकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER