
नवी दिल्ली : ब्रिटनच्या कोर्टाने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना २१ दिवसांत तीन चिनी बँकांना ७१७ दशलक्ष डॉलर्स भरण्याचे आदेश दिले आहे . या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल, असे हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितले .
ही रक्कम भरण्यास प्रतिवाद्यांना बंधनकारक आहे, असं न्यायमूर्ती नीगेल यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. यामुळे त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. ही एकूण रक्कम ७१ कोटी ६९ लाख १७ हजार ६८१ डॉलर्स इतकी आहे.
दरम्यान हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड द्वारे २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या व्यावसायिक कर्जाची निगडीत असल्याची माहिती अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी दिली. तसंच यासाठी त्यांनी वैयक्तीक हमी दिली होती, असेही ते म्हणाले. परंतु अनिल अंबानी यांनी हे कर्ज वैयक्तिकरित्या घेतले नव्हते असे ही निवेदनात म्हटले आहे. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनानं (ICBC) आपला दावा त्या आधारावर केला आहे ज्या हमीपत्रावर अनिल अंबानी यांनी कधी स्वाक्षरीचे केली नव्हती असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला