उजनीचा पाणीप्रश्न पेटला ; जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन

Maharashtra Today

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध करण्यात येत आहे .

उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे (Ujani Water Issue) सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे . तसेच जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले.

या प्रकरणाचा विरोध झाल्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

त्या निर्णयाचा अध्यादेश लेखी घ्यावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी परिसरातील भीमनगर येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. सोमवारी जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य सरकार त्वरीत तोंडी आश्वासने देतात, मात्र लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थळी अध्यादेश घ्यावा” अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button