उजनीचे पाणी : नवा अध्यादेश काढला नाही! जयंत पाटीलांवर गुन्हा दाखल करा – मागणी

Jayant Patil troll due to corona crises

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याचा पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र अद्याप याचा अध्यादेश काढला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे (Farmers Association) अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी केली.

आंदोलनाची दखल घेऊन अध्यादेश रद्द

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या पिण्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजूर केल्याचा अध्यादेश रद्द करा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने उजनी धरण परिसरातील भिमानगर येथे १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी १९ मे रोजी पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द केला होता. याबाबतची माहिती सोशल मीडियातून देण्यात आली.

सात दिवस झालेत पण नवा अध्यादेश नाही

मात्र सात दिवस उलटून गेल्यानंतरही जुना अध्यादेश रद्द करण्याचा नवा अध्यादेश काढण्यात आला नाही. जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहे.

प्रकरण

सोलापूरच्या उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button