UGC NET परीक्षा लांबणीवर; रमेश पोखरियाल यांची माहिती

Ramesh Pokhriyal - Maharastra Today
Ramesh Pokhriyal - Maharastra Today

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षादेखील लांबणीवर टाकली गेली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) निशंक यांनी दिली आहे.

UGC NET परीक्षा काय आहे?
देशभरातील विद्यापीठे तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती आणि सहायक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नॅशनल इलिजिबिलिटीचे आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, २०२० साली कोरोनामुळे या परीक्षांचे आयोजन लांबले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button