कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर, तर राष्ट्रवादीचा ‘हा’ खासदार गहू काढण्यासाठी शेतात!

Srinivas Patil-Udyanraje Bhosale

सातारा : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमध्येही साताऱ्यात मात्र दोन खासदारांचे आगळे – वेगळे रूप पाहायला मिळत आहेत.

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर आंदोलन करत होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील 9Srinivas Patil) यांनी हा वेळ शेतीची कामे उरकण्यासाठी सत्कारणी लावला.

वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी लोक श्रीनिवास पाटील यांना भेटायला येणार नाहीत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च्या शेतात गहू काढणीचे काम हाती घेतले. त्यानंतर साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला यापूर्वीच पूर्णपणे विरोध दर्शविला होता. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button