औदुंबर : धार्मिक व औषधी गुणयुक्त वृक्ष

उदुम्बर

धार्मिक महत्त्व असलेले उम्बराचे झाड सर्वांनाच परीचयाचे आहे. दत्त महाराजांचा आवडता वृक्ष म्हणून उदुंबर प्रसिद्ध आहे. दत्तमंदीराजवळ सहसा औदुंबराचे झाड आढळतेच. उदुम्बर, जन्तुफल, यज्ञांग, हेम दुग्धक अशी पर्यायी नावे असलेला उंबर वृक्ष औषधी गुणाचा देखील तेवढाच आहे.

 • उंबराचे त्वचा फळ क्षीर औषधी प्रयोगार्थ वापरण्यात येत.
 • उंबराच्या काड्या होम हवनार्थ वापरतात म्हणून त्याला यज्ञांगदेखील म्हणतात.
 • उंबराच्या पानांचे शृंग ( कळीसारखे दिसणारे) वर्ण्य आहे. त्यामुळे त्वचेला उजळ करणाऱ्या लेपांमध्ये हे वाटून वापरतात.
 • उंबराची पाने व्रण, जखम भरून काढणारी आहेत. पानांचा काढा करून व्रणधावनाकरिता वापरतात. त्यामुळे जखम स्वच्छ होऊन भरते.
 • तोंडाला फोड येणे, मुखपाकसारख्या व्याधींवर या पानांचा काढा करून गुळण्या करणे खूप फायदेशीर आहे.
 • सूज, गाठ, अर्बुद यामध्ये उंबराच्या दुधाचा लेप लावतात. सूज कमी होण्यास मदत होते.
 • रक्तयुक्त पातळ शौचास होणे, अतिसार यात कच्च्या फळाची भाजी खाण्यास देता येते.
 • पिकलेल्या फळाचे सरबत तहान भागवणारे आहे. उष्णतेने वारंवार तहान लागत असेल तर साखरेसह हे सरबत आल्हाददायक आहे.
 • नाक, कंठ, गुद यामधून जर रक्तस्राव होण्याचा त्रास असेल तर उबराचे पाणी खूप फायदेशीर ठरते.
 • वारंवार मूत्र प्रवृत्ती होणे, मधुमेह यात उंबराच्या सालीचा काढा खूप फायदेशीर ठरतो.
 • अतिप्रमाणात मासिक स्राव होणे, पांढरे पाणी जाणे या स्त्रीविकारांमध्येदेखील उंबराच्या सालीचा काढा फायदेशीर ठरतो.

पावसाळ्याच्या अखेरीस उंबराचे मूळ तोडून छेदून त्यातील पाझरणारे पाणी गोळा करून स्वच्छ पात्रात भरून ठेवतात. हे पाणी पित्ताला शांत करणारे, रक्तस्राव थांबणिवारे, गोवर, कांजिण्या यामध्ये होणारी उष्णता कमी करणारे असते.

ही बातमी पण वाचा : अडुळसा – कफ कमी करणारी वनस्पती !

वैद्य शर्वरी संदीप मिशाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER