उदित नारायण यांनी पहिली पत्नी ओळखण्यासही नकार दिला, न सांगता केले दुसरे लग्न

Udit naryan

९० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या मधुर आवाजाची जादू पसरविणारे गायक उदित नारायण (Udit Narayan) यांनी शेकडो सुपरहिट गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि बंगाली भाषांमध्येही गाणी गायली आहेत. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी बिहार येथे झाला. उदित नारायण यांनी दोन विवाह केले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी स्वतः वर्षानुवर्षे ही गोष्ट लपवून ठेवली.

उदित नारायण यांचे पूर्ण नाव उदित नारायण झा आहे. त्यांचा जन्म बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. त्यांचा नेपाळशी जवळचा संबंध आहे. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटातून नाही तर नेपाळी चित्रपटातून केले होते. या चित्रपटाचे नाव होते ‘सिंदूर’.

सुमारे दहा वर्षांच्या संघर्षानंतर उदित नारायण यांनी पहिले सुपरहिट गाणे दिले ज्याने त्यांचे भाग्य बदलले. हे गाणे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचे ‘पापा कहते है बड़ा नाम करेगा’ होते. हे गाणे आमिर खानवर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यानंतर उदित नारायण यांना बर्‍याच ऑफर मिळाल्या.

२००६ मध्ये रंजना नारायणने दावा केला की उदित नारायण तिचा नवरा आहे. परंतु उदितने हे नाकारले. त्यानंतर रंजनाने कोर्टाशी संपर्क साधला आणि फोटो आणि कागदपत्रे दाखवल्यानंतर उदितने लग्नाला होकार दिला. यानंतर कोर्टाने त्यांना दोन्ही पत्नींना एकत्र ठेवण्याचे आदेश दिले होते.

विवाहित असूनही, उदित नारायण यांनी १९८५ साली दीपा नारायणबरोबर सात फेरे घेतले. त्यांना दीपा पासून एक मुलगा आदित्य नारायण आहे. सांगण्यात येते की आदित्य देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच पार्श्वगायक (Playback Singer) आहे.

ही बातमी पण वाचा : बॉयफ्रेंड रोहमन शाल याने सुष्मिता सेनच्या नावाचे बनवले टॅटू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER