फडणवीस सरकारच्या काळातील महापोर्टल बंद करण्याचा उद्धव सरकारचा निर्णय

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षार्थींकडून त्रुटींबाबत वारंवार आलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सरकारचा १९ सप्टेंबर २०१७ रोजीचा निर्णय या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आला आहे.

सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – जितेंद्र आव्हाड

सरकारच्या विविध विभागाच्या गट – क आणि गट-ड आदी पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा देणारी कंपनी नियुक्तीची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात येईल, असे सरकारच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागीय पातळीवर जाहिरात आणि निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. महाआयटीची भूमिका ही कंपनी नियुक्तीपर्यंतच मर्यादित राहणार आहे, असेही त्यात म्हटले आहे. निवडलेल्या कंपन्यांतर्फे संबंधित विभागास परीक्षा घेता येणार आहेत.

सरकारच्या विविध विभागाच्या गट-क आणि गट – ड पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा संदर्भातील सर्व प्रशासकीय नियंत्रण हे सामान्य प्रशासन विभागाचे आहे, त्यामुळे पदभरतीसंदर्भात तांत्रिक अडचणी असल्यास गरजेनुसार महाआयटीमार्फत सल्ला दिला जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.