उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजे शिवसेनेची वाटचाल दिल्लीकडे – संजय राऊत

CM Uddhav Thackeray - Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेची (Shiv Sena) भविष्यातील वाटचाल ही भव्यदिव्य असेल. गेल्यावर्षी याच दिवसात युद्धाला प्रारंभ झाला. आपण महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आजचा महाविजयादशमी मेळावा साजरा करत आहोत.उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले म्हणजे महाराष्ट्रातील ११ कोटी जनता ही मुख्यमंत्री झाल्यासारखे आहे. महाराष्ट्र हा दिल्लीकडे जाईल ही सुरुवात आहे. त्यामुळे आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी (Mahavikas Aghadi) अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

यावेळी राऊत म्हणाले की, कोरोना नसता तर हा दसरा मेळावा जगाने नोंद घ्यावा असा ऐतिहासिक झाला असता. असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय होऊन आजचा हा दसरा मेळावा साजरा होत आहे. मी मागच्या दसरा मेळाव्या मध्ये सांगितले होते की पुढच्या दसरा मेळावा मध्ये आपले उद्धव साहेब मुख्यमंत्री असतील. आणि ते मुख्यमंत्री झाले. भविष्यात शिवसेनेने दिल्लीचे तख्त राखण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कोणी कितीही चिखलफेक केली तरी ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. किंबहुना त्यानंतरची २५ वर्ष आपलेच सरकार असेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

मी दरवेळी दिल्लीत जातो तेव्हा महाराष्ट्रातील सरकार पडणार, अशी चर्चा असते. महाराष्ट्र सरकार पाठवण्यासाठी २०० कोटी रुपये पाठवण्यात आलेत, असे सांगितले जाते. परंतु, २०० कोटी रुपये सांगून महाराष्ट्राची इज्जत काय घालवताय? एवढ्या रक्कमेचे व्यवहार तर महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या राजकारणात होतात. त्यामुळे महाराष्ट्राची पत ओळखून किमान २००० कोटींचे वैगेरे आकडे सांगावेत, अशा शब्दांता संजय राऊत यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

हिंदुत्वाचे धडे आम्हाला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री जे म्हणाले त्यामागे वीर सावरकर यांची प्रेरणा आहे. आम्ही महाराष्ट्राला देणे लागतो. हे देणं काय असतं हे या एका वर्षात मुख्यमंत्र्यांनी दाखवले आहे. सावरकर आणि हिंदुत्व, आणि बाळासाहेब यांचे नाते आहे. सावरकरांचे विचार घेऊनच शिवसेना पुढे जात आहे. अभूतपूर्व परिस्थितीत हा दसरा मेळावा साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तुमचे भाऊ आहेत, तुमचे पालक आहेत त्या पद्धतीने ते काम करत आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व हे महाराष्ट्रच करणार आहे. कोण कधी करणार हे लवकरच कळेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोना ची लागण झाली आहे ते लवकर बरे होऊ दे त्यांच्या साठी शुभेच्छा व्यक्त करतो. आम्ही रडीचा डाव खेळत नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोलाही लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER