उद्धवजी, शिवभोजन थाळी खायचीये, पण जायचं कसे ? पडळकरांनी व्हिडीओ केला शेअर

Uddhav Thackeray & GopichandPadalkar

मुंबई : राज्यात दररोज होत असलेली मोठी रुग्णवाढ आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, याची घोषणा करताना या काळात शिवभोजन थाळी मोफत देणार असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर केलं होतं. शिवभोजन थाळीमुळे अनेकांना जेवण मिळत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर शेअर केली जात असतानाच आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है… लेकिन जानेका कैसे?”, असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अडवताना दिसत आहेत. तर काहींना घराबाहेर पडले म्हणून शिक्षा देताना दिसत आहे,असे पडळकर म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button