उद्धव ठाकरेंचा सेना खासदारांना सल्ला, अयोध्येत राम मंदिर बांधा

uddhav-thackeray

मुंबई : २२ तारखेला राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटना प्रसंगी भाजप आणि शिवसेनेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानकाचं श्रेय लाटण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली होती. घडलेल्या प्रकारावर आपलं मौन व्रत तोडत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मंदिर बांधायचे असेल तर अयोध्येत बांधा असा कडवट सल्ला पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकरांना दिला आहे.

कोण काय म्हणणार किंवा काय करणार हे सगळं विसरून, राम मंदिर स्थानकाचं श्रेय कुणालाही जाऊ द्या परंतु, अयोध्येतील राम मंदिर बांधल्याचा श्रेय तुम्ही घ्या अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.