उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे इव्हेंट : इम्तियाज जलील

Imtiyaz Jaleel

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अयोध्या दौरा म्हणजे इव्हेंट आहे, अशी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. आगामी आता निवडणुका तोंडावर आल्याने, भाजप-शिवसेनाने युतीसाठी ही नौटंकी सुरु केली आहे,असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन

गेल्या चार वर्षांपासून भाजप-शिवसेना सत्तेत असूनही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत असतात. मात्र, आता आगामी निवडणूक लक्षात घेता, एकत्र कसे यायचे यासाठी अयोध्या दौरा केला जात आहे. अयोध्या दौरा म्हणजे एक इव्हेंट आहे. अयोध्येत सभा घेण्यास परवानगी दिली नव्हती. तर मग महाराष्ट्रातून एवढे शिवसैनिक का घेऊन गेले? असा सवाल जलील यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांना विचारला आहे.

पुढे जलील म्हणले, अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असणार.