उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाआघाडीत मतभेद नाही – सुप्रिया सुळे

Supriya Sule- Thackeray Family

रायगड : महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेतले. आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. आपण सगळेच पंढरपूर किंवा शिर्डीला दर्शनासाठी जातो. मीदेखील दरवर्षी पंढरपूरला जाते, अजमेरला जाते, जेजुरीला जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यात गैर काय. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यातील आघाडी सरकारवर काहाही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामेळाव्यासाठी त्या शनिवारी रायगडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

आमची छाती फाडली तरी रामच दिसेल; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अयोध्येचा दौरा केला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जमीन द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाची हवा काढली.