उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे पोकळ घोषणा : विनायक मेटे

uddhav thackeray & Vinayak Mete

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फक्त बोलण्यापेक्षा काहीतरी कृती करावी. त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणाबाजी होते, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली.

पुण्यात शिवसंग्राम पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेटे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवता आले नाही. जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान २० प्रमुख विभागांनी राबविलेल्या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या मराठा समाजातील सुमारे चार हजार उमेदवारांना आजपर्यंत नोकरीची संधी प्राप्त झालेली नाही.

महाविकास आघाडी सरकारमधील ठराविक मंत्री व प्रशासकीय अधिकारी आदेशातील शब्दांचा अर्थ काढत असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे बळी पडत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आझाद मैदानावर आंदोलन छेडणार

राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण व तरुणांच्या नोकरीबाबत आश्वासक पावले उचलली नाहीत तर राज्यपालांकडे याविषयी दाद मागणार आहोत. तिथेही काही मार्ग निघाला नाही तर शिवसंग्राम पक्ष आझाद मैदानावर धरणे आंदोलन करेल, असा इशारा मेटे यांनी दिला. अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. ते फक्त समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER