एकीकडे उद्धव ठाकरेंचा ‘स्वबळा’चा आढावा तर दुसरीकडे खासदारांची चुप्पी

Uddhav-Thackeray

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी आढावा बैठक बोलावली होती. दरम्यान या बैठकीत शिवसनेच्या खासदार चुप्पी साधून असल्याची सूत्रांनी दिली. या बैठकीला खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम आणि चंद्रकांत खैरै, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने आदी नेते उपस्थित होते .

ही बातमी पण वाचा:- लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढणार : उद्धव ठाकरे

सर्वेक्षणानुसार स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेनेला त्याचा जबर फटका बसू शकतो. एनडीएच्या जागा तर कमी होतीलच, मात्र शिवसेनेच्या वाट्यालाही राज्यात अवघ्या दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे . स्वबळाचा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला. खासदार अनिल देसाई यांनी त्याला अनुमोदन दिले. शिवसेनेचे सध्या 19 खासदार व 63 आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत किमान 25 खासदार आणि 150 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असा विश्वास शिवसेनेला आहे . तसेच शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशातील प्रत्येक राज्यातल्या निवडणुका लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

ही बातमी पण वाचा:-गोव्यातही शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार – संजय राऊत

दरम्यान उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत स्वबळाचा आढावा घेताना.आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल? असा सवाल उपस्थित केला असता त्यांचे खासदार निःशब्दच राहिले .